Posts

Showing posts from October, 2017

YAMAN - THE SWEETEST OF THE LOT

भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये असे फार कमी राग आहेत कि ज्यांना राग संगीतामध्ये महत्वाचं स्थान आहेच पण त्याचबरोबर सुगम संगीतामध्येही त्यांना विशेष महत्व आहे. आज आपण अशाच एका महासागरासारख्या विशाल रागावर focus करतोय. रागाचे नाव आहे 'यमन'. अगदी नवीन गाणं शिकणार्यांपासून ते मोठ्या कसदार कलाकारांपर्यंत सर्वांनाच आवडतो असा हा यमन. तसेच रसिक श्रोत्यांपासून ते अभ्यासू संगीत समीक्षकांपर्यंत सर्वांनाच भावतो असा हा यमन. यमन हा सर्वांचाच लाडका राग आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरू नये. Classes आणि Masses असा सगळ्यांनाच appeal करतो हा यमन. यमन इतका गोड, रंजक आणि लोकप्रिय राग शोधून सापडणार नाही. पाहूया तर मग ह्या जादुई रागातील स्वररचना कशी आहे ते :- यमन हा एक संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात तीव्र मध्यम आहे तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. हा एक रात्रीच्या पहिल्या प्रहराचा अतिशय विस्तारक्षम असा राग आहे. यमनची खासियत म्हणजे, ह्याचे प्रमुख स्वर (वादी) गंधार आणि (संवादी) निषाद असले तरी ह्या रागामध्ये कुठल्याही स्वरावर काही काळ न्यास करून आपण रागाचा विस्तार वाढवू शकतो. तसे करून राग भंग होत नाह...

SHUDDHA SARANG - THE EVERGREEN BEAUTY

सारंगचे अनेक सुंदर प्रकार आहेत. त्यातील एक अतिशय रंजक व impressive सारंग म्हणजे 'शुद्ध सारंग'. चटकन छाप पडते, हमखास रंगतो असा हा शुद्ध सारंग. काय स्वरांची जादू आहे पहा. मी आजतागायत कुणाचा शुद्ध सारंग पडला असे ऐकलेले नाही. अतिशय रंजक, मनाचा पटकन ताबा घेणारा असा हा राग. इतके सौंदर्य रागात असूनही त्यात कमालीची सादगी आहे, साधेपणा आहे. दुपारच्या वेळच्या ह्या evergreen रागाच्या स्वरांवर एक नजर टाकूया :- शुद्ध सारंग रागात 2 मध्यम आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. काही कलाकार 2 मध्यमांबरोबरच 2 निषाद पण वापरतात. पण मला माझ्या गुरूंकडून जी तालीम मिळाली आहे ती फक्त शुद्ध निषादाच्या शुद्ध सारंगची. ह्या रागात गंधार वर्ज आहे तर अवरोहात धैवत असला तरी तो आरोहात वर्ज आहे. त्यामुळे हा एक ओडव - षाडव जातीचा राग आहे. शुद्ध सारंगचे basic design च इतके पकड घेणारे आहे कि त्यातच ऐकणारा रमून जातो. ह्या रागातील खास गोष्ट म्हणजे ह्यातील दोन्ही मध्यमांचा सुंदर मिलाफ. 'रे मा प (रे) म.. रे' सारख्या गोड संगतीने शुद्ध म आणि तीव्र म मध्ये जो संवाद होत राहतो तो केवळ अद्भुत. हा सारंगचा प्रकार असल्याने अ...