Posts

Showing posts from July, 2017

MALGUNJI - THE MAGICAL CHAIN (IN ENGLISH)

Image
In our Hindustani classical music there are combination raagas (Jod Raagas) in which the raaga is formed by a combination of two raagas. Likewise there are also some raagas which are not combination raagas but still have a beautiful blend of 2 or more raagas in it. In such raagas there is no deliberate effort to simultaneously show the combination and mixture of raagas like we do in Combination Raagas. The blend in such raagas is so nicely interwoven that it is a natural process. We cannot term such raagas as Combination Raagas. Such raagas appear like natural raagas which have a different essence and flavour of their own. Today we will focus on one such raaga. This raaga is complex but it is also very sweet, melodious and royal. Name of the raaga is Malgunji. Malgunji is a beautiful blend of Bageshree and Rageshree.  It also has a shade of Jaijaiwanti in it. When I am saying it’s a blend, we don’t show these raagas on purpose in Malgunji. But we certainly get to see th...

PATDEEP - THE LESS PREFERRED (IN ENGLISH)

In our Hindustani classical music there are some raagas which get neglected for no reason. One such Raaga is Patdeep. Patdeep is a sweet raaga of third prahar of the day. In this Raaga Gandhar is Komal while all other swaras are Shuddha. In the Aaroh Rishabh and Dhaivat are omitted and in the Avroh all swaras are taken. Because of this even though the combination of the swaras is different, still the sequence of the swaras in Patdeep is similar to Raagas like Bhimpalas, Madhuwanti, Multani etc. (Sequence – NI SA GA MA PA NI SA, SA NI DHA PA MA GA RE SA’). And perhaps because of this common factor this raaga may have got neglected a bit. Of course inspite of that Patdeep still holds its separate, individual identity for sure. ‘ GA MA PA NI, PA NI SA DHA PA, DHA MA PA GA, SA GA MA GA RE SA’. These are few important phrases of Raaga Patdeep. According to some,Patdeep is formed just by changing  Bhimpalas Raaga’s Komal Nishad in to Shuddha Nishad. But I don’t think so. Be...

PATDEEP - THE LESS PREFERRED

आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये असंख्य राग आहेत परंतु काही राग काहीही विशेष कारण नसताना मागे पडत जातात. त्यापैकी एक म्हणजे पटदीप असे मला वाटते.  पटदीप हा दिवसाच्या तिसऱ्या प्रहराचा एक गोड राग आहे. ह्या रागात ग कोमल आहे तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. तसेच आरोहात रिषभ व धैवत वर्ज आहेत तर अवरोहात सर्व स्वर घेतले जातात. ह्यामुळे स्वरांचे combination जरी निराळे असले तरी भीमपलास, मधुवंती, मुलतानी सारख्या रागांप्रमाणेच पटदीप रागातही स्वरांचा क्रम 'नि सा ग म प नि सा' व 'सा नि ध प म ग रे सा' असाच आहे. आणि कदाचित ह्यामुळेच हा राग काहीसा दुर्लक्षित राहिला असावा. अर्थात तसे असले तरी पटदीप रागाचे अस्तित्व नक्कीच नाकारता येणार नाही. 'ग् म प नि, प नि सा ध प, ध म प ग् , सा ग् म ग् रे सा.' हे पटदीप रागातले काही महत्वाचे स्वरालाप. काहींच्या मते भीमपलासमधला कोमल निषाद शुद्ध केला कि पटदीप होतो. परंतु मला तसे नाही वाटत. कारण फक्त नि शुद्ध  करून बाकी सगळा भीमपलासच आहे असे दिसत नाही. त्या एका शुद्ध निषादामुळे सगळ्या स्वरांचे समीकरण बदलते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्यातील कोम...

THE SWEETEST OF MALHAR - THE GAUD MALHAR

'मल्हार' च्या अनेक प्रकारांमधील 'गौड मल्हार' हा एक लोकप्रिय व प्रचलित असा राग आहे. हा राग इतका गोड आहे कि केव्हातरी वाटते ह्या रागाचे नाव 'गौड मल्हार' ऐवजी 'गोड मल्हार' असते तरी चालले असते. हा राग ग्वाल्ल्हेर घराण्याच्या खास रागांपैकी एक आहे. आक्रमक, दमदार तसेच प्रवाही असा हा राग आहे. 'मल्हार अंग' आणि 'गौड अंग' अश्या दोन्ही अंगांच्या मिश्रणातून हा राग तयार झाला आहे. अगोदर आपण हि दोन्ही अंग नीट समजून घेऊया :- 1) गौड अंग - 'रे ग..रे सा, सा..रे ग म, म प म, म ग म, ग रे ग..रे सा, नि सा रे ग म प म'. 2) मल्हार अंग - 'म रेss प, नि्s नि सा'. वरील दोन्ही अंगांचे एक चपखल आणि बेमालूम मिश्रण म्हणजेच 'गौड मल्हार' होय. गौड मल्हार हा एक चलन अंगाचा राग आहे. आता आपण नजर टाकूया ह्या रागातील स्वरांवर :- गौड मल्हार रागामध्ये दोन्ही निषाद आहेत व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्या रागाचे स्वरूप वक्र आहे. षड्जा व्यतिरिक्त ह्या रागात शुद्ध मध्यमावर व पंचमावर ठेहेराव करता येतो. ह्या रागातील प्रमुख स्वरालाप व स्व...

SARANG WITHOUT THE SARANG ANG - GAUD SARANG

Image
आज आपण एका सुंदर चलन अंगाच्या रागावर focus करूया. दुपारच्या वेळचा हा एक अतिशय गोड असा राग आहे. नाव आहे 'गौड सारंग'. 'गौड सारंग' हे नाव ऐकताच हा जोड राग आहे कि काय, सारंग चा प्रकार आहे कि काय असे आपल्या मनात चटकन आले असेल. परंतु ना हा जोड राग आहे व ना हा सारंग चा प्रकार आहे. नाही म्हणायला ह्यात 'प रे सा' संगती मध्ये प वरून रे सा वर येताना त्यात शुद्ध म येतो, ज्यामुळे थोडी 'म रे' हि सारंगची छटा डोकावते आहे कि काय असे वाटते. परंतु तसे असले तरी ह्या रागात सारंगचे असे काही विशेष अंग दिसत नाही. काहींच्या मते ह्यात 'कल्याण' अंग आहे. पण मला स्वतःला असे वाटते कि गौड सारंग हे गौड अंगाचेच एक अतिशय गोड व लोभसवाणे असे रूप आहे. 'गौड जैसा रंग' वरून गौड सा-रंग असा अपभ्रंश झाला असावा असे श्री. अद्वैत गाडगीळ (उत्तम सतारवादक) हे मला मागे एकदा म्हणाले होते, हे त्यांना त्यांचे गुरु उस्ताद शाहिद परवेझ ह्यांच्याकडून कळले. थोडक्यात काय, तर हा सारंग नसलेला......(गौड)सारंग असेच म्हणता येईल. एक नजर टाकूया ह्या रागातील स्वरांवर :- गौड सारंग हा एक संपूर्ण जातीचा व...

BHOOP AND DESKAR, THE TWIN BROTHERS

Image
आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये काही राग असे पहायला मिळतात कि त्यांचे स्वर तर सारखेच असतात, परंतु तरी देखील त्यांची निराळे व भिन्न राग म्हणून आेळख असते. ते भिन्न होतात कारण सारखे स्वर असले तरी त्या स्वरांना ट्रिटमेंट निरनिराळ्या प्रकारे दिलेली असते. ह्यातील एक उदाहरण म्हणजे भूप व देसकार. ह्या दोन्ही रागांचे स्वर वरकरणी नजर टाकता सारखेच दिसतात. परंतु जशी एखाद्या घरामध्ये जुळी भावंड असतात,  जी दिसायला हुबेहुब एक सारखी असूनही त्यांचे स्वभाव व Mannerisms अगदी भिन्न असून त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व असते. तसेच भूप आणि देसकार हे राग आहेत असे मला वाटते.  ह्या दोन्ही रागांचे स्वर सारखे आहेत दोन्ही मध्ये म व नी हे स्वर वर्जित आहेत. दोन्ही रागांमध्ये सर्व स्वर शुद्ध आहेत. परंतु तसे असले तरी ह्या दोन्ही रागांमध्ये स्वरांना दिलेली जी ट्रिटमेंट आहे ती पूर्णतः निराळी आहे. आणि म्हणूनच भूप व देसकार ह्या रागांना त्यांची स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र अोळख आहे.  भूप मध्ये वादी ग आणि संवादी ध आहे तर देसकार मध्ये वादी ध आणि संवादी ग आहे. ह्यातून एक गोष्ट उघड आहे कि भूप हा पु...

ENJOY THE RAINS WITH MIYA MALHAR

सर्वत्र अंधारून आले, मेघांची दाटी झाली, सोसाट्याचा वारा सुटला आणि धुवाधार पाऊस पडायला लागल्यावर नेमका त्याचवेळी दूर कुठून तरी भीमसेनजींचा 'मिया मल्हार' कानावर पडावा. अा हा हा हा !!! .....काय माहोल तयार होतो म्हणून सांगू. केवळ अवर्णनीयच. पावसाळा सुरु झाला कि सहाजिकच ह्या ऋतूमध्ये खास गायल्या जाणाऱ्या 'मिया मल्हार' रागाचे वेध लागतात. आपल्या शास्त्रीय संगीतात जसे प्रत्येक वेळेनुसार राग आहेत त्याचप्रमाणे काही राग हे seasonal हि आहेत. हे राग त्या त्या ऋतूंमध्येच सादर करायची प्रथा आहे. वर्षा ऋतू म्हंटलं कि 'मल्हार' चे अनेक प्रकार ऐकायला मिळतात. मुळात मल्हार हे एक 'अंग' आहे. 'म रे प' व कोमल निषादाला लागून शुद्ध निषाद लावून षड्जावर 'नि् नि सा' विसावणे हि दोन्ही मल्हार अंग आहेत. प्रत्येक मल्हारच्या प्रकारात ह्यातील एकतरी phrase असतेच. सर्वच मल्हारच्या प्रकारांमध्ये एकप्रकारच पाऊसाच वातावरण तयार होते असे म्हटले जाते. परंतु मला स्वतःला खरे पाऊसाचे वातावरण 'मिया मल्हार' रागाने तयार होते असे वाटते. ह्या बहारदार रागाच्या जादुई स्वरांव...