HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR
आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये असेही काही राग गायले/वाजवले जातात जे मूळतः कर्नाटकी राग म्हणून प्रचलित व प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकी व हिंदुस्थानी ह्या अगदी दोन भिन्न शैली असूनही हे कर्नाटकी शास्त्रीय संगीतातले राग जेव्हा आपल्या हिंदुस्थानी संगीतामध्ये गायले/वाजवले जातात तेव्हा त्यातले बरेचसे राग अगदी सहज विलीन झालेले दिसतात. आज आपण अशाच एका रागावर लक्ष केंद्रित करतोय. रागाचे नाव आहे हंसध्वनी. हंसध्वनी हा एक अतिशय सुमधुर व रंजक असा राग आहे. कर्नाटकी संगीतातला जरी हा राग असला तरी हा राग आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये पण खूप लोकप्रिय झालेला आहे. एक नजर टाकूया ह्या रागातील स्वररचनेवर :- हंसध्वनी रागातील सर्व स्वर शुद्ध आहेत. हा एक ओडव-ओडव जातीचा राग आहे. म्हणजेच ह्या रागात आरोह-अवरोहामध्ये प्रत्येकी 5-5 स्वर आहेत. ह्या रागामध्ये मध्यम व धैवत हे दोन्ही स्वर वर्ज आहेत. रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा हा राग आहे. ह्या रागात एक प्रकारचा अवीट गोडवा व रसाळपणा आहे. हिंदुस्तानी संगीतातील शंकरा रागाचं कर्नाटकी संगीतातील parallel version म्हणजे हंसध्वनी, असेही ...