AHIR BHAIRAV - THE SWEETEST BHAIRAV
भैरवच्या प्रकारांमधील एक अतिशय लोकप्रिय असा राग म्हणजे
'अहिर भैरव'. सकाळच्या वेळचा हा एक फार गोड राग आहे. काहींच्या मते अहिर
भैरव म्हणजे भैरव आणि अहिरी/अभिरी ह्या रागांचं मिश्रण आहे तर काहींच्या
मते भैरव आणि काफी ह्या रागांच्या मिश्रणातून अहिर भैरव राग निर्माण झाला
असावा. मला स्वतःला मात्र अहिर भैरव रागाचे स्वरूप कधीच जोड रागाचे वाटले
नाही. हा राग म्हणजे एक अखंड असं स्वतंत्र अस्तित्व आहे असेच मला वाटते. हा
राग म्हणजे एक संपूर्णपणे निराळेच रसायन आहे असे मला वाटते, आणि त्यामुळेच
'भैरव'चे एक सुंदर variation म्हणूनच मी 'अहिर भैरव' रागाकडे नेहमी पहातो.
अहिर
भैरव रागातील स्वरांची रचना कशी आहे हे पाहण्याआधी आपण सर्व प्रथम भैरव
अंग नीट समजून घेऊया. भैरव रागामध्ये कोमल रिषभ व कोमल धैवत आहेत, व ते
आंदोलित आहेत. 'ग म रे्ss सा' आणि 'ग म ध्ss प' ह्या भैरव रागातील प्रमुख
phrases आहेत. ह्यापैकी एक तरी phrase आपल्याला भैरवच्या प्रकारामध्ये
नक्कीच पहायला मिळते.
आता आपण अहिर भैरव रागाच्या स्वररचनेवर focus करूया :-
अहिर
भैरव हा एक संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागामध्ये कोमल रिषभ व कोमल
निषाद आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्या रागात भैरवचे अंग
पुर्वांगात 'ग म रे्s सा' ह्या स्वरालापामध्ये कोमल रिषभाला आंदोलित करून
दाखवले जाते. ह्या रागात वादी मध्यम आहे तर संवादी षड्ज आहे. अहिर भैरव
रागात षड्ज व मध्यमा बरोबरच पंचमावर पण ठेहराव करता येतो.
काही विशेष महत्वाचे असे :-
जशी
एखादी व्यक्ती निरनिराळ्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर निरनिराळ्या
प्रकारे react होते, त्याचप्रमाणे स्वर सुद्धा जेव्हा निरनिराळ्या
स्वरांच्या संपर्कात येतात तेव्हा ते निराळ्या तर्हेने व्यक्त होताना
दिसतात. जसे त्यांचे नाते बदलते तसाच त्यांच्यातला संवाद बदलतो. ह्याचे
उत्तम उदाहरण आपल्याला ह्या रागात पहायला मिळते. भैरवमध्ये जो संवाद कोमल
रिषभाचा कोमल धैवताशी होतो तसा संवाद अहिर भैरवमध्ये कोमल रिषभाचा कोमल
निषादाबरोबर होत नाही.
भैरव
रागाच्या तुलनेत अहिर भैरव रागात कोमल रिषभाचे आंदोलन बर्याच अंशी कमी
झालेले दिसते. कोमल रिषभ आणि कोमल निषाद ह्या दोन्ही स्वरांना आंदोलनं असली
तरी ती माफक प्रमाणात आहेत. तसेच भैरव मधील अति कोमल रिषभ अहिर भैरव मध्ये
थोडा चढा होतो. आणि हा कोमल रिषभ किंचित चढा लावला तरच तो ह्यातील कोमल
निषादाशी मेळ खातो.
आता आपण अहिर भैरव रागातील काही आलापांवर नजर टाकुया :-
'गम
रे्s सा, नि्s ध नि्रे् सा, सारे्ग म, रे्गमप म, गमपगमरे्s सा, सारे् ग म
प, गमपधनि्s धप, पधनि् धप म, गमनि् धपमरे्, रे्गमपधपमरे्, गमरे्s नि्s ध
नि्रे् सा'.
अहिर भैरव हा
एक मोठा आलाप प्रधान राग आहे. सुंदर आलापी करायला ह्या रागात खूप वाव आहे.
सावकाश एकेक स्वरांची गुंफण करत अहिर भैरव राग सादर केला तर तो अतिशय रंगत व
बहरत जातो.
श्री. समीर अभ्यंकर.
Comments
Post a Comment