Posts

Showing posts from November, 2017

NAT BIHAG - A BEAUTIFUL AND ATTRACTIVE MIX

Image
बिहागच्या अनेक प्रकारांमध्ये सर्वात impressive आणि भावखाऊ बिहागचा प्रकार म्हणजे 'नट बिहाग'. पहिल्या स्वरापासून मनाचा ताबा घेणारा असा हा एक विलक्षण राग आहे. 'बिहागचा प्रकार' प्रमाणेच आपण ह्या रागाला 'नटाचा प्रकार' म्हणून पण संबोधु शकतो कारण नट बिहाग हा एक जोड राग आहे. असे नट रागाचे अंग असलेले बरेच जोड राग आहेत त्यातील नट बिहाग हा माझा सर्वात आवडीचा राग आहे. पूर्वांगात एक आणि उत्तरांगात दूसरा अशा प्रकारे काही राग जोडले गेलेले असतात. परंतु नट बिहाग हा अशा प्रकारे जोडला गेलेला नाही. ह्यामध्ये नट अंग हे प्रामुख्याने पूर्वांगात दिसते व खास प्रकारे कोमल निषाद दाखवून उत्तरांगातही अधूनमधून नटाचे अंग दर्शवले जाते. तर बिहाग ह्या रागामध्ये पूर्वांगात व उत्तरांगात असा सर्वत्रच दिसतो. अर्थात तीव्र मध्यम नट बिहाग मध्ये नाही आहे. पण तरी देखिल नट बिहाग रागात बिहाग अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसत राहतो. ह्या रागामध्ये दोन्ही निषाद आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. नट बिहाग हा एक षाडव संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात आरोहात धैवत वर्जित आहे. दोन्ही निषादांमध्ये शुद्ध न...