Posts

Showing posts from August, 2017

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

Today we will focus on a very ancient raga. Some believe this raga is a creation of Lord Shiva. I don’t know how true it is but whenever I listen to this raga I feel like I am witnessing Lord Shiva’s Tandava. Many among you must have guessed the raga. Yes, I am talking about Raga Shankara. Shankara, a beautiful raga loaded with lot of aggression and energy. Some also believe that Shankara is a parallel version of a Carnatic Raga, Hansadhwani. Let us throw a glance on the notes (swaras) of this amazing raga :- Shankara is a uttarang pradhan raga where the raga gets established and developed more in higher swaras of the Saptak. This raga has a lot of fluidity as well as aggression. This Raga is of Audav – Shadav nature, which means it has 5 swaras in the ascending order while it has 6 notes in the descending order. Madhyam Swara is omitted in this raga. Although Shuddha Rishabh is taken in the descending order, it is omitted in the ascending order. All swaras in this raga ar...

JOG - A BEAUTIFUL NIGHT MELODY

आज आपण एका अतिशय श्रुतिमनोहर रागावर लक्ष केंद्रित करत आहोत. रागाचे नाव आहे जोग. 'जोग' ..... रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा एक सुंदर व आकर्षक राग. तसा हा राग काही फार प्राचीन नाही. ह्या रागाची खासियत म्हणजे ह्यात केले जाणारे मींडकाम. मींडकामाला जोग रागामध्ये खूप वाव आहे. एक नजर टाकूया जोग रागातील स्वरांवर :- जोग हा एक ओडव-ओडव जातीचा राग आहे. ह्या रागात रिषभ व धैवत हे स्वर वर्ज आहेत. ह्या रागामध्ये 2 गंधार आहेत, कोमल निषाद आहे व बाकी स्वर शुद्ध आहेत. जोगमध्ये कोमल गंधार आणि कोमल निषाद हे दोन्ही स्वर आंदोलित केले जातात. काही कलाकार जोगमध्ये कोमल निषादाबरोबर शुद्ध निषाद पण वापरतात. जो जोग मी माझे गुरु पं. मुकुंद थत्ते ह्यांच्याकडून शिकलो तो फक्त कोमल निषादवाला जोग. फक्त कोमल निषादाच्या जोगमध्ये पण काही कलाकार (खास करून आग्रा घराण्याचे) तार षड्जावर जाताना केव्हातरी थोडा शुद्ध निषादाचा कण घेवून षड्ज लावतात. 'जोग' चे खरे सौंदर्य त्याच्या 2 गंधारांमध्ये दडलेले आहे असे मला वाटते. ह्या दोन्ही गंधारांच्या जादुई करामतींमध्ये श्रोते हमखास गुंगून जातात. ह्यामध्ये आरोहात शुद्ध गंधार त...

RAMKALI - BHAIRAV ESSENCE WITH A TADKA OF TEEVRA MADHYAM

आज आपण दिवसाच्या पहिल्या प्रहराच्या  एका सदाबहार व सुंदर रागावर लक्ष केंद्रित करतोय. रागाचे नाव आहे रामकली. रामकली हा भैरव थाटातील एक प्रमुख राग आहे. भैरव ला  तीव्र मध्यम आणि कोमल निषादाची जोड दिली कि रामकली होतो असा एक सर्व साधारण समज आहे. परंतु मला तसे वाटत नाही. रामकली मध्ये तीव्र मध्यम आणि कोमल निषाद ह्यांचा समावेश असलेल्या 'मा प ध नि् ध प' ह्या स्वरालापाने एक वेगळेच चैतन्य आणि मूड तयार होतो. खास करून तीव्र मध्यम मूळतः शांत आणि धीरगंभीर असलेल्या भैरवच्या स्वरांना चांगलाच 'तडका' मारायचं काम करतो. ह्या अतिशय रंगतदार अशा रागाच्या स्वरांची रचना जरा समजून घेऊया :-   भैरव थाटातील स्वरांप्रमाणे ह्यात रिषभ व धैवत हे दोन्ही स्वर कोमल आहेत. त्याचबरोबर रामकली रागामध्ये 2 मध्यम व 2 निषाद आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्या रागात मुख्य थांबायची ठिकाणं म्हणजे ह्यातील षड्ज आणि पंचम. जरी भैरवपेक्षा रामकलीमध्ये 2 निराळे स्वर असले तरी काही ठिकाणी हे दोन राग एकमेकांजवळ येऊ शकतात. पाहूया रामकली भैरव रागापासून कसा वेगळा आहे :- 1) सगळ्यात मोठ्ठा फरक आहे तो आंदोलनांचा. भ...

MALGUNJI - THE MAGICAL CHAIN

Image
आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये जोड राग तर आहेतच पण त्याचबरोबर काही असेही राग आहेत जे जोड राग नसूनही त्यामध्ये दोन किंवा जास्ती रागांची छाया दिसते. हा एक बेमालूम मिलाफ असतो. त्यात कुठेही जाणून बुजून राग जोडलेले नसतात. अशा रागांचे चलनच असे असते कि त्यात कळत नकळत अगदी सहजतेने 3-4 राग डोकावतात. असाच एक राग म्हणजे मालगुंजी. मालगुंजी म्हणजे जणू काही तीन रागांच्या बेमालूम मिश्रणाने गुंफली गेलेली एक सुंदर फुलांची माळ. ह्यात तुम्हाला बागेश्री आणि रागेश्री हे दोन्ही राग दिसत राहतात आणि मधेच जयजयवंती रागाची पण छटा दिसत राहते. मालगुंजी हा रात्रीच्या प्रहराचा एक मधुर व मोहक राग आहे. ह्या रागात 2 गंधार आहेत, कोमल निषाद आहे व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. मालगुंजीमध्ये सातही स्वर आहेत व ह्या रागाचे स्वरूप वक्र आहे. आरोहात पंचम वर्ज असला तरी 'सा रे म प ध' व 'प ध नि् ध प म ग' अशा phrases मध्ये पंचम ह्या रागात वापरलेला दिसतो. अवरोहात सर्व स्वर आहेत. ह्या रागात सर्वात महत्वाचा स्वर ह्यातील शुद्ध मध्यम आहे. मालगुंजी मध्ये आपण शुद्ध मध्यम व षड्जावर चांगला ठेहराव करू शकतो. मालगुंजी रागा...

ASAWARI/JAUNPURI - SAME PERSONALITY WITH DIFFERENT NAMES

जशी काही माणसं दोन नावांनी ओळखली जातात तसेच काही राग पण दोन नावांनी ओळखले जातात असे मला वाटते. आसावरी (शुद्ध रिषभाचा) आणि जौनपुरी ह्या दोन रागांबाबतीत माझे काहीसे असेच मत आहे. काहींच्या मते हे दोन स्वतंत्र राग आहेत. परंतु मला तसे नाही वाटत. त्याचे कारण म्हणजे, जेव्हा आपण दोन भिन्न राग आहेत असे म्हणतो तेव्हा त्यामध्ये तेवढी भिन्नता असणे आवश्यक आहे, निराळी रस निष्पत्ती होणे गरजेचे आहे. परंतु आसावरी (शुद्ध रिषभाचा) आणि जौनपुरी ह्या दोन रागांमध्ये तसा काही निराळा जाणवेल असा फरक मला दिसत नाही. नाही म्हणायला आसावरी मध्ये 'म प ध् सा' करतात व जौनपुरी मध्ये 'म प ध् नि् सा' करतात असे म्हणतात. पण हा फरक फारच negligible / insignificant आहे असे मला वाटते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे निराळा असा भाव प्रकट होताना दिसत नाही. त्यामुळे आसावरी = जौनपुरी असेच मी मानतो. त्यात आसावरी हा मुळात एक थाट आहे. आणि ह्या थाटातला एक राग म्हणजे जौनपुरी. त्यामुळे मी ह्यांना दोन निराळ्या नावांनी न संबोधता फक्त 'जौनपुरी' ह्या नावानेच संबोधतो. 'जौनपुरी'... दिवसाच्या दुसऱ्या प्रहराचा एक ...

RAGESHREE - THE LAZY ELEGANCE

'पंचम' सारखा अतिशय महत्वाचा स्वर रागात नसूनही जर त्या रागात शुद्ध मध्यम प्रबळ असेल तर त्या रागाचे एक निराळेच वातावरण तयार होते. अशा प्रकारचे राग सादर करताना तानपुऱ्यामध्ये पण पंचमाच्या ऐवजी मध्यम लावला जातो. ' म सा सा सा ' असे तानपुरे झंकारायला लागले कि आपले मन अतिशय एकाग्र आणि तद्रूप होते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हि मनाची अवस्था लगेच साधली जाते आणि मग चटकन डोळ्यापुढे असे मध्यम प्रधान व पंचम वर्जित राग येतात. जसा सकाळचा ललत, उत्तररात्रीचा मालकौंस इत्यादी. असाच एक राग आहे 'रागेश्री'. 'रागेश्री'..... रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा एक भारावून टाकणारा सुमधुर, आकर्षक व असरदार राग. ह्या रागाच्या स्वरांबद्दल थोडे जाणून घेऊया :-   रागेश्री मध्ये आरोहात रिषभ व पंचम वर्ज आहेत व अवरोहात पंचम वर्ज आहे त्यामुळे हा एक ओडव-षाडव जातीचा राग आहे. ह्या रागात कोमल निषाद आहे व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. दोन्ही निषाद घेऊन पण हा राग सादर करायची प्रथा आहे. परंतु मी माझे गुरु पं. मुकुंद थत्ते ह्यांच्याकडून फक्त कोमल निषादाचा रागेश्री शिकलो आहे व तोच गातो.    रागेश्री राग...

KAMOD - THE FLOWING RIVER

आपल्या शास्त्रीय संगीतात काही चलन अंगाचे राग असतात ज्यामध्ये एका विशिष्ट चलनाभोवती (phrase) राग फिरत राहतो. अश्या रागांमध्ये प्रमुख चलन अंगाच्या तुलनेत बाकी स्वरांना/स्वरालापांना तुलनेने दुय्यम महत्व असते. ह्या प्रकारच्या रागांमध्ये मोडणारा एक राग म्हणजे कामोद. कामोद हा रात्रीच्या पहिल्या प्रहराचा एक खास राग आहे. ह्या रागाचे स्वरूप वक्र आहे. हा एक संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात 2 मध्यम आहेत व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. कामोद हा ग्वाल्हेर घराण्याच्या खास रागांपैकी एक मानला जातो. ह्या रागातील स्वरांवर एक नजर टाकूया :- ह्या रागात सातही स्वर असले तरी षड्ज आणि पंचमाशिवाय अन्य कुठल्याही स्वरांवर न्यास करता येत नाही. कामोद रागातले अगदी प्रमुख चलन म्हणजे 'रे प, ग म प ग म रे सा.' ह्या चलनाभोवती बाकी सर्व स्वर फिरत राहतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ह्या रागातील काही आलाप बघूया :- सा रे सा, रे प, ग म प ग म रे सा, म रे प, प ध प, प सा ध प, ग म ध प रे प, ग म प ग म रे सा. कामोद मध्ये दोन्ही मध्यम असले तरी ह्यात शुद्ध मध्यम जास्ती वापरला जातो. तीव्र मध्यम अधून मधून...