RAMKALI - BHAIRAV ESSENCE WITH A TADKA OF TEEVRA MADHYAM
आज आपण दिवसाच्या पहिल्या प्रहराच्या एका सदाबहार व सुंदर रागावर लक्ष केंद्रित करतोय. रागाचे नाव आहे रामकली.
रामकली हा भैरव थाटातील एक प्रमुख राग आहे. भैरव ला तीव्र मध्यम आणि कोमल निषादाची जोड दिली कि रामकली होतो असा एक सर्व साधारण समज आहे. परंतु मला तसे वाटत नाही. रामकली मध्ये तीव्र मध्यम आणि कोमल निषाद ह्यांचा समावेश असलेल्या 'मा प ध नि् ध प' ह्या स्वरालापाने एक वेगळेच चैतन्य आणि मूड तयार होतो. खास करून तीव्र मध्यम मूळतः शांत आणि धीरगंभीर असलेल्या भैरवच्या स्वरांना चांगलाच 'तडका' मारायचं काम करतो.
ह्या अतिशय रंगतदार अशा रागाच्या स्वरांची रचना जरा समजून घेऊया :-
भैरव थाटातील स्वरांप्रमाणे ह्यात रिषभ व धैवत हे दोन्ही स्वर कोमल आहेत. त्याचबरोबर रामकली रागामध्ये 2 मध्यम व 2 निषाद आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्या रागात मुख्य थांबायची ठिकाणं म्हणजे ह्यातील षड्ज आणि पंचम. जरी भैरवपेक्षा रामकलीमध्ये 2 निराळे स्वर असले तरी काही ठिकाणी हे दोन राग एकमेकांजवळ येऊ शकतात. पाहूया रामकली भैरव रागापासून कसा वेगळा आहे :-
1) सगळ्यात मोठ्ठा फरक आहे तो आंदोलनांचा. भैरव रागातील कोमल रिषभ आणि कोमल धैवताची आंदोलनं रामकली रागात बऱ्याच अंशी कमी होतात.
2) भैरव रागात मुख्य भर आंदोलनांबरोबरच मींडकामावर पण असतो. मात्र रामकली रागामध्ये मींडकाम/आंदोलनं कमी होतात व खटके आणि मुरक्यांना अधिक वाव मिळतो. असे होण्यास 'तीव्र मध्यम' प्रामुख्याने कारणीभूत ठरतो. साहजिकच त्यामुळे भैरवच्या तुलनेत रामकली रागाचे गांभीर्य निश्चितपणे कमी होते व तो अधिक गतिमान होतो.
3) भैरवमध्ये आपण 'सा रे् ग म प' करतो त्या ऐवजी आपण रामकली रागामध्ये 'सा ग म प' करतो.
4) भैरवमध्ये 'ग म रे् सा' करतो त्या ऐवजी आपण रामकली रागामध्ये 'ग म प म रे् सा' करतो.
आणखीन काही महत्वाचे असे :-
'म प ध नि ध प' हा स्वरालाप गाताना त्यात काही कलाकार (खास करून आग्रा घराण्याचे कलाकार) कोमल निषाद न लावता शुद्ध निषाद लावतात. जसे कि 'मा प ध नि् ध प' ऐवजी 'मा प ध नि ध प'. असे केल्याने रामकलीला नक्कीच थोडा निराळा रंग चढतो.
रामकली रागाचे काही रागवाचक आलाप :-
'ग.. म प म रे् सा, सा ग म प, मा प ध नि् ध प, ध मा प ग, रे् ग म प म रे्s सा. सा.. ग म (मा) प, ग म ध्s प, ग म ध् नि सा ध्s प, माप पध् ध् नि ध् प, ध् मा प ग, ग म प म रे्s सा'.
जर खुबीने आणि युक्तीने रामकली गायला तर तो बराच वेळ विस्तार करूनही गाता येतो. आणि तीव्र मध्यमाचा वापर करताना जर त्यात एक प्रकारचं surprise element असेल तर 'सोने पे सुहागा'च.....
श्री. समीर अभ्यंकर.
https://soundcloud.com/sameer-sharadchandra-abhyankar/raga-ramkali-performed-by-sameer-abhyankar
HAVE SHARED A LINK OF RAAGA RAMKALI PERFORMED BY ME IN A CONCERT. DO LISTEN :-)

Comments
Post a Comment