ASAWARI/JAUNPURI - SAME PERSONALITY WITH DIFFERENT NAMES
जशी काही माणसं दोन नावांनी ओळखली जातात तसेच काही राग पण दोन नावांनी ओळखले जातात असे मला वाटते. आसावरी (शुद्ध रिषभाचा) आणि जौनपुरी ह्या दोन रागांबाबतीत माझे काहीसे असेच मत आहे.
काहींच्या मते हे दोन स्वतंत्र राग आहेत. परंतु मला तसे नाही वाटत. त्याचे कारण म्हणजे, जेव्हा आपण दोन भिन्न राग आहेत असे म्हणतो तेव्हा त्यामध्ये तेवढी भिन्नता असणे आवश्यक आहे, निराळी रस निष्पत्ती होणे गरजेचे आहे. परंतु आसावरी (शुद्ध रिषभाचा) आणि जौनपुरी ह्या दोन रागांमध्ये तसा काही निराळा जाणवेल असा फरक मला दिसत नाही. नाही म्हणायला आसावरी मध्ये 'म प ध् सा' करतात व जौनपुरी मध्ये 'म प ध् नि् सा' करतात असे म्हणतात. पण हा फरक फारच negligible / insignificant आहे असे मला वाटते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे निराळा असा भाव प्रकट होताना दिसत नाही. त्यामुळे आसावरी = जौनपुरी असेच मी मानतो. त्यात आसावरी हा मुळात एक थाट आहे. आणि ह्या थाटातला एक राग म्हणजे जौनपुरी. त्यामुळे मी ह्यांना दोन निराळ्या नावांनी न संबोधता फक्त 'जौनपुरी' ह्या नावानेच संबोधतो.
'जौनपुरी'... दिवसाच्या दुसऱ्या प्रहराचा एक राजा राग. जौनपुरीची खास बात म्हणजे ह्या रागात कसल्याही करामती न करता नुसते सुंदर आणि सुरेल गायले तरी हा राग तेजाने झळाळून उठतो. काय मोहक आणि आकर्षक राग आहे म्हणून सांगू. अतिशय अप्रतिम.
पाहुयात ह्या रागाचे स्वर कसे आहेत ते :-
ह्या रागामध्ये ग ध आणि नि कोमल आहेत व बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. हा एक षाडव-संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात आरोहात गंधार वर्ज आहे. जौनपुरी रागात मुख्य थांबायचे स्वर म्हणजे षड्ज आणि पंचम. ह्या रागात कोमल ग आणि कोमल ध ह्या स्वरांना थोड्या प्रमाणात आंदोलित केले जाते. तसेच ग् रे सा ऐवजी ग् (रे सा) रे सा असे केले जाते.
जौनपुरी रागातील काही महत्वाचे स्वरालाप :-
'रे म ग्s (रे सा) रे सा, रे म प, रे म प नि् ध् प, म प ध् नि् सा, नि् सा रे नि् ध्s प, ध् म प सा ध् प, रे म प ध् म प ग्s रे, प ग् (रे सा) रे सा.'
दरबारी कानडा रागाचे आणि जौनपुरी रागाचे स्वर जरी सारखे असले तरी त्यातील स्वरांना निराळ्या संगीतींमध्ये घेऊन दोन्ही राग वेगळे होतात. दरबारी कानडा रागापासून जौनपुरी राग कसा वेगळा राहतो :-
1) 'सा रे ग् म रे सा' असे दरबारीमध्ये आपण करतो तर जौनपुरी मध्ये 'रे म ग्s (रे सा) रे सा' असे करतो.
2) 'म प ध् नि् प' असे दरबारीमध्ये आपण करतो तर जौनपुरी मध्ये आपण 'रे म प नि् ध् प' करतो.
हि शिस्त जर आपण पाळली तर दरबारी कानडा पासून जौनपुरी अगदी स्वच्छ वेगळा दिसत राहतो.
मला असे वाटते कि जौनपुरी हा एक असा राग आहे कि ज्यामध्ये चमत्कृतीची गरजच नाही. जसे क्रिकेट मध्ये spinners साठी tailormade pitch बनवल कि कसलेही प्रयोग न करता फक्त योग्य टप्प्यावर चेंडू टाकला कि पुरेस असतं तसेच ह्या रागात फक्त रागवाचक आलाप जरी कोणी सुरेलपणाने गायले तरी जौनपुरी बहरायला आणि रंगायला लागतो.
श्री. समीर अभ्यंकर.

Comments
Post a Comment