YAMAN - THE SWEETEST OF THE LOT
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये असे फार कमी राग आहेत कि ज्यांना राग संगीतामध्ये महत्वाचं स्थान आहेच पण त्याचबरोबर सुगम संगीतामध्येही त्यांना विशेष महत्व आहे. आज आपण अशाच एका महासागरासारख्या विशाल रागावर focus करतोय. रागाचे नाव आहे 'यमन'.
अगदी नवीन गाणं शिकणार्यांपासून ते मोठ्या कसदार कलाकारांपर्यंत सर्वांनाच आवडतो असा हा यमन. तसेच रसिक श्रोत्यांपासून ते अभ्यासू संगीत समीक्षकांपर्यंत सर्वांनाच भावतो असा हा यमन. यमन हा सर्वांचाच लाडका राग आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरू नये. Classes आणि Masses असा सगळ्यांनाच appeal करतो हा यमन. यमन इतका गोड, रंजक आणि लोकप्रिय राग शोधून सापडणार नाही. पाहूया तर मग ह्या जादुई रागातील स्वररचना कशी आहे ते :-
यमन हा एक संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात तीव्र मध्यम आहे तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. हा एक रात्रीच्या पहिल्या प्रहराचा अतिशय विस्तारक्षम असा राग आहे. यमनची खासियत म्हणजे, ह्याचे प्रमुख स्वर (वादी) गंधार आणि (संवादी) निषाद असले तरी ह्या रागामध्ये कुठल्याही स्वरावर काही काळ न्यास करून आपण रागाचा विस्तार वाढवू शकतो. तसे करून राग भंग होत नाही हे विशेष महत्वाचे.
यमनचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागाचे चलन. बहुतेक रागांमध्ये रागाचे जे specific चलन असते ते एक, दोन ठिकाणीच दिसते पण यमन रागासारखे काही अपवाद आहेत कि ज्यामध्ये रागातील कुठलीही phrase हि रागाचा चेहराच होऊन जाते. आणि म्हणूनच यमन रागाचा आवाका इतका मोठा आहे. यमन रागातील सर्वात influential स्वर म्हणजे ह्यातील तीव्र मध्यम. ह्या तीव्र मध्यमामुळे बाकी सर्व स्वर तेजाने झळाळून उठतात. ह्याच यमनमध्ये शुद्ध मध्यम खुबीने मिसळला कि त्याचा यमन कल्याण होतो. हे म्हणजे मुळात सुंदर जमलेल्या बर्फीवर चांदीचा वर्ख लावण्यासारखेच आहे.
यमन रागावर आधारित सिने संगीतामध्ये अनेक गाणी आहेत, ह्यात अनेक नाट्यपदं आहेत, अभंग आहेत, गझल आहेत. यमन राग वापरला गेला नाही असा कुठलाही भारतीय संगीतातला form नाही. ह्या अतिशय versatile अशा रागातील काही आलाप पाहूया :-
'ध नि रे सा, नि रे ग, नि रे ग मा रे ग रे, ग रे सा, नि रे ग मा पमा ग, रे ग मा प, ग मा (नि) ध प, ध माप ग, रे ग मा प रे ग रे, ध नि रे ग मा प रे सा'.
असा हा सर्व घराण्यांनी आपलासा मानलेला 'यमन'. अनेक कलाकार यमन सुंदर सादर करतात. परंतु मला स्वतःला भीमसेनजींचा यमन विशेष भावतो. भिडतोच म्हणा ना. असा नुकताच सूर्यास्त होऊन दिवेलागणीच्या वेळी भीमसेनजींनी अफाट गायलेली 'एरी आली पियाबीन' हि यमन रागातील प्रसिद्ध बंदिश कानावर पडावी. आहाहा !!! ब्रम्हानंदी टाळी लागल्यावाचून रहात नाही.
श्री. समीर अभ्यंकर.

Comments
Post a Comment