BHOOP AND DESKAR, THE TWIN BROTHERS

आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये काही राग असे पहायला मिळतात कि त्यांचे स्वर तर सारखेच असतात, परंतु तरी देखील त्यांची निराळे व भिन्न राग म्हणून आेळख असते. ते भिन्न होतात कारण सारखे स्वर असले तरी त्या स्वरांना ट्रिटमेंट निरनिराळ्या प्रकारे दिलेली असते. ह्यातील एक उदाहरण म्हणजे भूप व देसकार.

ह्या दोन्ही रागांचे स्वर वरकरणी नजर टाकता सारखेच दिसतात. परंतु जशी एखाद्या घरामध्ये जुळी भावंड असतात,  जी दिसायला हुबेहुब एक सारखी असूनही त्यांचे स्वभाव व Mannerisms अगदी भिन्न असून त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व असते. तसेच भूप आणि देसकार हे राग आहेत असे मला वाटते. 

ह्या दोन्ही रागांचे स्वर सारखे आहेत दोन्ही मध्ये म व नी हे स्वर वर्जित आहेत. दोन्ही रागांमध्ये सर्व स्वर शुद्ध आहेत. परंतु तसे असले तरी ह्या दोन्ही रागांमध्ये स्वरांना दिलेली जी ट्रिटमेंट आहे ती पूर्णतः निराळी आहे. आणि म्हणूनच भूप व देसकार ह्या रागांना त्यांची स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र अोळख आहे. 

भूप मध्ये वादी ग आणि संवादी ध आहे तर देसकार मध्ये वादी ध आणि संवादी ग आहे. ह्यातून एक गोष्ट उघड आहे कि भूप हा पुर्वांग प्रधान राग आहे व देसकार हा उत्तरांग प्रधान राग आहे.

भूप रागामध्ये गंधार फार महत्वाचा आहे. त्यावरील ठेहराव,  त्यावर केलेली कामगत ह्यातून भूप रागाचा विस्तार बहरत जातो. त्याच गंधाराला देसकार मध्ये ठेहराव नाही आहे. तसे असुनही देसकार मध्ये गंधार स्वर षड्ज व पंचम हे स्वर जोडून ठेवायचे महत्वाचे काम करतो. 

देसकार मध्ये जो मध्य सप्तकातला धैवत आहे तो खूप महत्वाचा आहे. हा धैवत खडा आहे, तो थेट व रोखठोक आहे. एकदम मध्य षड्जावरून मध्य सप्तकातला धैवत थेटपणे लावला कि देसकार लगेच भूप पासून निराळा दिसून येतो. देसकार मधील ह्या धैवतावर न्यास आहे. त्या उलट भूपाच्या धैवतामध्ये एक तर्हेचा मुलायमपणा आहे, त्यात एक आर्जव आहे. भूपामध्ये धैवतावर न्यास नसलातरी तो पंचम व षड्ज ह्या स्वरांना जोडून ठेवायचं उत्तम काम करतो.

दुसरं अस कि भूप जसा अवरोही राग आहे तसा देसकार हा एक आरोही राग आहे. उदा. जर आपण भूप मधले स्वरालाप पाहिले तर त्यात ग रे, प ग, ध प ग, अश्या प्रकारे स्वर वरतून खाली असे येताना दिसतात त्यामुळे हा राग अधिक पूर्वांगात खुलतो. ह्याच्या अगदी उलट आपल्याला देसकार मध्ये पहायला मिळते. सा रे ध सा, ग प, ग प ध, सा ध, ध सा प ध ग प, ध प ग प ध. अश्या प्रकारे स्वर खालून वरती जाण्याची क्रिया सतत दिसून येते. त्यामुळे हा विशेष करून उत्तरंगात गायला जाणारा राग आहे. तसेच प्रकृती मध्ये हि भूप व देसकार मध्ये भिंन्नता दिसते. भूप हा शांत प्रकृतीचा राग असून त्यात मींडकांम जास्ती पाहायला मिळते. परंतु देसकार हा चंचल व आक्रमक प्रकृतीचा राग असल्याने ह्या रागात खटक्यांचा वापर अधिक केला जातो.

असे हे सारखे स्वर असूनही एकमेकांपासून भिन्न असलेले दोन राग......

श्री. समीर अभ्यंकर.














Shared Raag Bhoop performed by me in a concert in 2 parts. Do listen 😊








Comments

  1. Wahwa. Bahot Khoob. Your Blogs are very informative. Keep the good work going.

    ReplyDelete
  2. Vasanti Katchi PatwardhanJuly 23, 2017 at 3:52 AM

    'Journey Through Ragas'
    ची संकल्पना व सुरवात खूप छान.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY